शासनाने मुलांच्या प्रगतीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून शिक्षकांच्या प्रयत्नांना पालकांनीही साथ द्यावी, असे आवाहन बेळगाव तालुका अक्षरा दासोह अधिकारी रवी जवळेकर यांनी केले.


बेळगाव तालुक्यातील काकती येथील सरकारी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभोनिमित्त आयोजित कार्यक्रमात रवी जवळेकर बोलत होते. या वेळी नवीन विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत करून त्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा कुरुबर यांनी, मुलांच्या उपस्थितीसोबतच त्यांच्या अभ्यासासाठी पालकांनीही प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यापूर्वी शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून नवीन शैक्षणिक वर्षाबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमाला जमुना कोळी, रेणुका कोळी, सिद्राई सुतार, दस्तगीर कोन्नूर, ललिता महाजनशेट्टी, गीता कानट्टी, शशिकला होसूर, श्रीदेवी मरकुंबी, श्रीदेवी दिब्बी, शकुंतला कराळे, गीता गुडी, सुमित्रा राऊत, सुमित्रा करविनकोप्प आणि शमिमा हुबळी यांच्यासह शाळेचे शिक्षक, एसडीएमसी सदस्य आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक अशोक होत यांनी स्वागत केले. शिवानंद तल्लूर यांनी सूत्रसंचालन केले, तर गिरीश जगजंपी यांनी आभार मानले.


Recent Comments