बेळगाव जिल्हा रोलर स्केटींग असोसिएशनतर्फे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संकल्पनेवर आधारित स्केटींग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील गोवा वेस जलतरण तलाव परिसरात ही रॅली काढण्यात आली. या वेळी स्केटींग करत मुलांनी नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती केली. झाडांमुळे आपल्याला सावली, फळे आणि भरपूर ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे मानवाच्या अस्तित्वासाठी वृक्षलावड करणे अत्यंत आवश्यक आहे, असे महानगरपालिका नगरसेवक नितीन जाधव यांनी म्हटले. या प्रसंगी चित्रकार वसंत निर्मळे, स्केटींग प्रशिक्षक सूर्यकांत हिंदलगेकर, विशाल वेसने, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश प सारे, सोहम हिंदलगेकर, मिसेस महात, समीर महात, करुणा वाघेला, विजय नाईक आणि तुळशी हिंदलगेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते.

या रॅलीमध्ये प्रानिका मोटेकर, कुलदीप बिर्जे, प्रांजल पाटील, सत्यम पाटील, जान्हवी तेंडुलकर, आशिष अंगडीकर, श्रेयस भजंत्री, आदर्श नाईक, रचित नांगरे, राजवीर कदम, प्रीतम बागेवाडी आणि सार्थक चव्हाण या स्केटर्सनी सहभाग घेतला होता.


Recent Comments