उत्तर विभागाचे नूतन पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पोलीस अधिकारी संदीप पाटील यांचा बेळगावमध्ये वकिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बेळगावमध्ये आयोजित सत्कार समारंभात आयजीपी संदीप पाटील यांच्या कार्यपद्धतीचा वकिलांनी गौरव केला. सत्कार स्वीकारल्यानंतर, समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग आणि न्यायव्यवस्था यांच्यात समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे संदीप पाटील यांनी म्हटले.

या प्रसंगी बेळगाव वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब घोरपडे, आर. पी. पाटील, एन. आर. लातूर, मारुती कामाण्णाचे, राजू हिरेमठ, विनोद पाटील, निंगाप्पा मस्ती, मोहिते, महेंद्र कांबळे, विभूतीमठ, राजेंद्र नलवडे आणि एम. बी. बोंद्रे या ज्येष्ठ वकिलांसह अनेक वकील उपस्थित होते. उपस्थित सर्व वकिलांनी नूतन आयजीपी यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.


Recent Comments