Belagavi

बेळगावात कचरा व्यवस्थापनाबाबत आजपासून नवीन कडक नियम

Share

बेळगाव महापालिका क्षेत्रात कचरा विल्हेवाट व्यवस्थापनाबाबत आजपासून नवीन आणि कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, नागरिकांना आता चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो घंटागाडीकडे देणे बंधनकारक राहील.

महापालिका कार्यालयात पत्रकारांशी बोलताना आयुक्त कार्तिक एम. यांनी या कडक नियमांची घोषणा केली. शहराची स्वच्छता आणि कचरामुक्त व्यवस्थापनासाठी प्रत्येक नागरिकाला आता घरातील कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि ‘स्पेशल केअर वेस्ट’ अशा ४ प्रकारांमध्ये वेगळा करावा लागेल. हा वर्गीकृत कचरा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून महापालिकेच्या कचरा वाहतूक वाहनांकडे द्यावा लागणार आहे.

विशेषतः ‘स्पेशल केअर वेस्ट’ अंतर्गत येणारे विजेचे बल्ब, इंजेक्शन सिरिंज यांसारखे घातक पदार्थ पूर्णपणे वेगळे करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहराचे पर्यावरण सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी महापालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती आयुक्त कार्तिक एम. यांनी केली.

Tags: