Belagavi

बेळगाव: हलगा येथील सरकारी मराठी शाळेत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

Share

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील हलगा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश करणाऱ्या लहान मुलांची ट्रॅक्टर ट्रॉलीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच त्यांना गुलाबाचे फूल आणि मिठाई देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. हलगा गावातील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत पहिल्या दिवशी शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षक आणि एसडीएमसी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून संपूर्ण शाळा आवार फुलांनी आणि रंगीबेरंगी फुग्यांनी सजवले होते. शाळेला एका नववधूप्रमाणे नटवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.

यंदा पहिलीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या लहान मुलांना विविध फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसवून ढोल-ताशांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सरकारी शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यांवरून ही मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक संपवून शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षकांनी प्रेमाने स्वागत केले व त्यांना मिठाई दिली.

Tags: