बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने परिसर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सखोल स्वच्छतेसाठी आज पहाटे विशेष मोहीम राबवण्यात आली.


बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने आजपासून सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी पहाटे ६ वाजल्यापासून पोस्टमन सर्कल, इस्लामिया हायस्कूल, बोगारवेस, पिकेट रोड आणि मासे बाजाराजवळील स्वच्छतागृहांची जेट क्लीनिंग यंत्रांच्या साहाय्याने पूर्ण स्वच्छता केली.


या मोहिमेदरम्यान स्वच्छतागृहात कचरा टाकल्यामुळे ड्रेनेज लाईन चोकअप होऊन आरोग्य धोक्यात आल्याचे बोर्डाने म्हटले आहे. तसेच काही समाजकंटकांकडून स्वच्छतागृहांच्या मालमत्तेचे नुकसान केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून, कॅन्टोन्मेंट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार यांनी केले आहे.



Recent Comments