डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे आपण यापूर्वी वर्तवलेले भाकीत आता खरे ठरले आहे, असे प्रतिपादन हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केले.


चिक्कोडी तालुक्यातील येडूर येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील श्रीक्षेत्र येडूर मध्ये वीरशैव-लिंगायत धर्मोत्थान संमेलन आणि राजगोपूर लोकार्पण सोहळा पार पडला. . या कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी उपमुख्यमंत्री डीकेशी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. डीकेशी यांना धर्मगुरूंबद्दल अपार आदर असल्याचे त्यांनी नमूद केले.

“डीकेशी हे धर्मगुरूंना पाहताच अत्यंत आदराने वागतात. स्वतःला समर्पित करण्याची भावना त्यांच्यात आहे. याच गुणांमुळे मी त्यांना वैयक्तिकरित्या पसंत करतो आणि याच कारणासाठी ते मुख्यमंत्री होतील असे मी पूर्वी म्हटले होते, जे भाकीत आता खरे ठरले आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी व्यक्त केली. स्वामीजींच्या या वक्तव्याने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भाविकांचे आणि नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी डीकेशी यांचे नेतृत्व आणि त्यांचा धार्मिक क्षेत्राशी असलेला स्नेह याबद्दल कौतुक करण्यात आले.


Recent Comments