बेळगावमधील बेवूर रस्त्यावर मध्यरात्री एक महाकाय वडाच्या झाडाची फांदी कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी कर्मचाऱ्यांसह स्वतः जेसीबीवर उभे राहून झाड हटवले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

बेळगावमधील बेवूर रस्त्यावर मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक एका मोठ्या वडाच्या झाडाची फांदी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. झाड पडल्यामुळे विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी बेळगाव कॅन्टोन्मेंट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांच्याशी संपर्क साधला.
नागरिकांच्या समस्येला तात्काळ प्रतिसाद देत साजिद शेख यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबी मशीनवर उभे राहून कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडाच्या फांद्या तोडून रस्ता पूर्णपणे साफ केला. आता बेवूर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.


Recent Comments