Belagavi

आमदार आसिफ सेठ यांना मंत्रीपद देण्याची हरळय्या समगार समाजाची मागणी

Share

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी हरळय्या समगार समाजाच्या पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हरळय्या समगार समाजाच्या पंच कमिटीचे सदस्य लक्ष्मण माचकनूर यांनी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात आमदार आसिफ सेठ यांना मंत्रीपद देण्याची मागणी केली. आमदार आसिफ सेठ हे सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे धर्मनिरपेक्ष नेते असून त्यांना मंत्रीपद दिल्यास बेळगावच्या विकासाला गती मिळेल, असे लक्ष्मण माचकनूर यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेला राजेंद्र बिडकर, देवेंद्र कांबळे, परशराम तोरे, गणपती कांबळे, सचिन माने, श्रीदेवी काळे, किरण मुरगोड यांच्यासह समाजाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: