राज्यातील काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेला वाद आणि सत्ताकारणाचा गोंधळ आता कायमचा मिटला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मांडली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान दिल्लीवारी ठरल्यानंतर बेंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षांतर्गत वाद मिटवण्यावर भर दिला. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याची वेळ निश्चित झाली असून उद्या तिथे नेमकी काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दौऱ्यात आपण एकटेच दिल्लीला जात नसल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.



Recent Comments