Belagavi

बेळगावमध्ये २७ मे रोजी ‘राष्ट्रीय सत्संग आणि संस्कार अभियान’

Share

बेळगावमधील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक आणि बाल विकास केंद्राच्या वतीने बुधवार, २७ मे रोजी ‘राष्ट्रीय सत्संग आणि संस्कार अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. वडगावमधील सपार गल्ली येथील श्री बनशंकरी मंगल कार्यालयात हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.

या विशेष कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बुधवार, २७ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक आणि संस्कारपर कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून संस्थेतर्फे सर्वसामान्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध मोफत सेवा, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि बाल विकास योजनांची सविस्तर माहिती दिली जाईल. या राष्ट्रीय सत्संग सोहळ्याला बेळगाव शहर आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Tags: