Bagalkot

दर्गा खटला मागे घेण्यावरून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने

Share

कलबुर्गी येथील लाडले मशाक दर्गा वादाशी संबंधित खटला मागे घेतल्याने भाजपकडून होत असलेल्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या आरोपांना अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी बागलकोटमध्ये चोख उत्तर दिले आहे.

मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी भाजपवर केवळ धर्माचे राजकारण करण्याचा आरोप केला. “दर्गा खटला मागे घेण्यावरून टीका करणाऱ्या भाजपने, आम्ही आधी शेतकऱ्यांचे खटले मागे घेतले तेव्हा जात-धर्म का पाहिला नाही?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असताना आणि पेट्रोल, डिझेल, सिलिंडर महाग होत असतानाही केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

राज्यात मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा हायकमांड पातळीवर सुरू नसल्याचे तिम्मापूर यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींचा निर्णय अंतिम राहील आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे त्याला बांधील आहेत. या चर्चांमुळे विकासकामांवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि मुख्यमंत्री सक्षमपणे काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

Tags: