बेळगाव उत्तर मतदारसंघातील अमन नगर येथील एचकेएमसी कॉलनीमधील मुख्य रस्त्यांच्या विकासाचे काम पूर्ण झाले असून यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


अमन नगरमधील एचकेएमसी कॉलनीतील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन या भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आले होते.


या विकासकामाची सुरुवात होण्यापूर्वी अमान सेठ यांनी परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या होत्या. पावसाळ्यात येथे निर्माण होणाऱ्या समस्येपासून आता कायमची सुटका झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.



Recent Comments