बेळगाव शहर पोलिसांनी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी धडक कारवाई करत आयपीएल क्रिकेट बेटिंग, मटका जुगार आणि गांजा सेवन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करत अनेक आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.


टिळकवाडी पोलिसांनी व्हॅक्सिन डेपो परिसरात ऑनलाईन आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी विशाल नागोडी पाटील याला तर सराफ कॉलनीतून गांजा सेवन केल्याप्रकरणी विनायक रामदास बिडीकर या दोघांना अटक केली; रोहन नामक अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे. उद्यमबाग पोलिसांनी मजगावमधील ब्रह्मदेव मंदिराजवळ करून मटका जुगार चालवणारा सहदेव अण्णप्पा शेल्यागोळ याला रंगेहात पकडले. तर मार्केट पोलिसांनी जुन्या भाजी मार्केटजवळ छापा टाकून मटका खेळल्याप्रकरणी श्रीधर रघुराम शेट्टी आणि नासीरअहमद नौशाद बोजगार या दोघांना अटक केली. मारीहाळ पोलिसांनी मुचंडी येथील सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावरून सुधीर बसवण्णी गुंडानी आणि बाळेकुंद्री गावातील व्हायरस मैदानाजवळून दीपक शिवाजी सोनाची या दोघांना गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक केली. या सर्व यशस्वी कारवायांबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.



Recent Comments