Belagavi

आर. एल. लॉ कॉलेजमध्ये ‘कन्नड नुडी वैभव’ सोहळा उत्साहात संपन्न

Share

बेळगावमधील कर्नाटक लॉ सोसायटीच्या राजा लखमगौडा लॉ कॉलेजमध्ये ‘कन्नड नुडी वैभव-२०२६’ या कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते.


कर्नाटक लॉ सोसायटीचे राजा लखमगौडा लॉ कॉलेज आणि कन्नड संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याच्या निमित्ताने संस्कृतीचा गौरव करणारी एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी होऊन सांस्कृतिक संदेश दिला. यानंतर महाविद्यालयाच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये रंगभूषाकार डॉ. शशिधर नरेंद्र आणि डीसीपी नारायण बरमणी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक यांनी भूषवले.


या वेळी मार्गदर्शन करताना डीसीपी नारायण बरमणी यांनी सांगितले की, भाषा ही आपली अस्मिता असून तिला समृद्ध इतिहास लाभला आहे. त्यांनी आपल्या ४० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत, वाढत्या गुन्हेगारीवर आणि व्यसनाधीनतेवर भाष्य केले. व्यसन हे केवळ एका व्यक्तीलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते, त्यामुळे समाजजागृतीसाठी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, कन्नड संघाचे प्रभारी अध्यक्ष चेतनकुमार टी. एम., संजना इटगी, यल्लप्पा बम्मनळ्ळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: