Belagavi

बसवण कुडचीमध्ये ‘कुडची प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Share

बसवण कुडची येथील मोरया स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित ‘केपीएल कुडची प्रीमियर लीग’ सीजन-२ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी रात्री मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत गावातील एकूण १२ नामांकित संघांनी सहभाग नोंदवला आहे.

या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा कर्नाटक राज्य भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेनके उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि स्पर्धेच्या भव्य चषकाचे अनावरण करून या लीगचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेतील पहिला सलामीचा सामना ‘जी के ब्रदर्स’ आणि ‘व्ही एन एस स्पोर्ट्स’ या संघांमध्ये खेळवण्यात आला.

या वेळी बोलताना अनिल बेनके यांनी सांगितले की, क्रीडा स्पर्धांमुळे युवकांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते. कुडची गावाला खेळाची खूप चांगली परंपरा लाभली असून समाजसेवक परशराम बेडका आणि सर्व संयोजकांनी ही क्रिकेटची परंपरा अखंडित राखण्याचे उत्तम कार्य केले आहे.

या उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक सिद्राय मेत्री, समाजसेवक परशराम बेडका, बाबू बेडका, प्रकाश बेडका, प्रकाश अनगोळकर, सुहास जोडगुंडे, बसवंत खंडोचे, बसवंत चौगले, कुंतीनाथ पाटील, शीतल पाटील यांच्यासह स्थानिक नेते, विविध संघांचे मालक आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन कडेमणी यांनी केले, तर महेश इटगेकर यांनी आभार मानले.

Tags: