Chikkodi

चिक्कोडीत रस्ता विकास कामाचा शुभारंभ

Share

चिक्कोडी तालुक्यातील नणदी डी.के.एस.एस.के. कारखान्यापासून ते बसवनगुडी कॅनॉलपर्यंतच्या रस्ता विकास कामाचा शुभारंभ विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


रस्ता कामाच्या शुभारंभानंतर बोलताना विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी संबंधित कंत्राटदाराला रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश दिले. कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी माध्यमांशी बोलताना, मागणीनुसार रस्ता मंजूर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच गेल्या एका वर्षात नणदी गावात विविध विकासकामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला मल्लू हवालदार, रामचंद्र मडिवाळे, राजेंद्र शिंदे, कांतेश नाईक, राजू चव्हाण, मोशिन देसाई, संजय किराई, विठ्ठल हवालदार, बंडा नाईकवाडी, अण्णा चिनगे, परशुराम थोरात, अम्मनी केंचनवर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: