इंधन बचतीसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचे डीडीपीआय सीतारामू यांनी एक आदर्श पायंडा घालून दिला असून, ते दररोज सायकलवरूनच कार्यालयात जात आहेत.

देशभरात यापूर्वी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकप्रतिनिधी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी इंधन बचतीसाठी मेट्रो, सरकारी बस आणि सायकलचा वापर केल्याचे पाहायला मिळाले आहे. याच धर्तीवर, चिक्कोडीचे डीडीपीआय सीतारामू यांनी त्यांना मिळालेली सरकारी गाडी बाजूला ठेवून, दररोज सायकल चालवत कार्यालयात येण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

जागतिक पातळीवर इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याने आपण सर्वांनी इंधनाचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे, म्हणूनच मी सायकलने कार्यालयात येण्याचा निर्णय घेतला असून इतर शासकीय अधिकाऱ्यांनीही आठवड्यातून किमान काही दिवस बस किंवा सायकलचा वापर करून पर्यावरण व इंधन संवर्धनात सहभाग घ्यावा, असे चिक्कोडीचे डीडीपीआय सीतारामू यांनी म्हटले.


Recent Comments