बेळगावमधील शिवबसव नगर येथे अत्याधुनिक हायटेक उद्यानाच्या विकासकामांचा शुभारंभ उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आला.


शासनाच्या ४० लाख रुपयांच्या निधीतून हे उद्यान विकसित केले जात असून यामध्ये नागरिकांसाठी सुसज्ज वॉकिंग ट्रॅक, हायमास्ट दिवे आणि इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासोबतच समोरील श्री जोतिबा मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी या उद्यानाचा लाभ घेतानाच त्याच्या स्वच्छतेची व देखभालीची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार आसिफ सेठ यांनी केले.


या सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले कारंजी मठाचे श्री गुरूसिद्ध स्वामीजी यांनी सांगितले की, वॉर्ड क्रमांक २६ अंतर्गत येणाऱ्या शिवबसवेश्वर नगरमधील नागरिकांची ही मागणी आमदार आसिफ शेठ यांनी निधी मंजूर करून पूर्ण केली आहे. या भागातील नागरिकांनी उद्यानाचे पावित्र्य व सौंदर्य टिकवून ठेवावे, अशी प्रतिक्रिया श्री गुरूसिद्ध स्वामीजी यांनी दिली.

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments