Belagavi

बेळगावमधील ‘त्या’ गुंतवणूक फसवणूक प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द

Share

बेळगावमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या सुमारे ४,५०० कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली असून प्रकरणाची सर्व कागदपत्रे सीआयडीने ताब्यात घेतली आहेत.

बेळगावमध्ये गुंतवणूक फसवणुकीच्या आरोपामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याबाबत बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय बैठक झाली. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सीआयडीचे डीआयजी भीमाशंकर गुळेद यांच्यासह तीन प्रमुख तपास अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते. या बैठकीत मार्केट विभागाचे एसीपी, माळमारुतीचे सीपीआय आणि सीईएन पोलीस ठाण्याचे सीपीआय देखील सहभागी झाले होते. स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत केलेला तपास, जप्त केलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि संकेतस्थळावर आधारित डिजिटल पुराव्यांबाबत सीआयडी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. बैठक संपल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकृत फाईल्स आणि जप्त केलेले महत्त्वाचे दस्तऐवज सीआयडी पथकाने आपल्या ताब्यात घेतले असून आजपासूनच अधिकृत तपास सुरू केला आहे.

Tags: