Belagavi

मुचंडी येथील श्री महालक्ष्मी आणि श्री मरगाई देवी जत्रेचा आज चौथा दिवस

Share

बेळगावमधील मुचंडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी आणि श्री मरगाई देवी यात्रोत्सवाचा आज चौथा दिवस असून हा उत्सव अत्यंत उत्साहात सुरू आहे.

गेल्या चार दिवसांत तब्बल १ लाख २० हजारहून अधिक भाविकांनी देवींचे दर्शन घेतले असल्याची माहिती मंदिर कमिटीने दिली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येत्या पुढील पाच दिवसांत लाखो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून मंदिर कमिटीच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित पाच दिवसांत विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे येत्या १८ मे रोजी सोमवार दिनी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील नामवंत पैलवान सहभागी होणार असून भाविकांसाठी महाप्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags: