बेळगावमधील काँग्रेस रोडवरील अरुण चित्रपटगृह आणि पहिल्या रेल्वे गेटजवळ दोन व्यक्ती अनेक तासांपासून अस्वस्थ आणि बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत एकाच जागी पडून असलेल्या या व्यक्ती अतिउष्णतेमुळे बेशुद्ध पडल्या आहेत की दारूच्या नशेत आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या संदर्भात स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अशा घटनांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या परिस्थितीबाबत नागरिक संतोष दरेकर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केले असून संबंधित व्यक्तींना तातडीने मदत मिळवून देण्याची विनंती केली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर अशा स्थितीत आढळणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात यावे, जेणेकरून मुख्य रस्त्यांवरील कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशी प्रतिक्रिया संतोष दरेकर यांनी दिली असून प्रशासनाने या दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


Recent Comments