Belagavi

शिवम असोसिएट्स प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची शिफारस

Share

बेळगावमधील शिवम असोसिएट्स या बोगस कंपनीने हजारो नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे तपासात समोर आले असून, या घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची शिफारस आजच केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार केलेल्या पडताळणीत बेंगळुरूमधील आरबीआय अधिकाऱ्यांनी या कंपनीची कोणतीही नोंदणी नसल्याचे स्पष्ट केले असून, एका निनावी पत्राद्वारे सेबी आणि सीआयडीकडे माहिती गेल्याने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले जात आहे.

सोशल मीडियाद्वारे एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तीन टक्के परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांकडून ३०० ते ४०० कोटी रुपये गोळा केल्याचे संशयित आरोपी शिवानंद नीलणावर याच्या सीएकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला चालक म्हणून काम करणाऱ्या आणि केवळ बारावी उत्तीर्ण असलेल्या शिवानंदने बेकायदेशीरपणे या ठेवी गोळा केल्या असून, तो सध्या तपासात सहकार्य करत नसल्याने त्याला पोलीस कोठडीत घेतले जाईल, तसेच या प्रकरणात आयेशा आरामी भेटवस्तू घेणाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

Tags: