बेळगावमधील शिवम असोसिएट्स कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालमारुती पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीला अटक केली आहे. या अटकेनंतर पोलिसांनी तपास यंत्रणा अधिक गतिमान केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे.


संशयित आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी शिवबसवनगरमधील कंपनीच्या मुख्य कार्यालयात पंचनामा प्रक्रिया सुरू केली आहे. तपास अधिकारी संतोष सत्यनायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू असून, यापूर्वी पोलिसांनी सील केलेले कार्यालय उघडून सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या पंचनामा प्रक्रियेत पोलिसांसह विविध शासकीय विभागांमधील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी ‘सोको’ (SOCO) पथक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, महसूल आणि सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी आर्थिक व्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची सखोल माहिती घेण्यासाठी ही संयुक्त मोहीम वेगाने राबवली जात आहे.


Recent Comments