बेळगावमधील हेमू कलानी चौकातील नूतन मंदिरात श्री दत्तगुरू आणि श्री साईबाबांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडत आहे. या निमित्ताने संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


बेळगावमधील प्रमुख चौक असलेल्या हेमू कलानी चौकातील मंदिरात श्री दत्त आणि श्री साईबाबांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी धार्मिक विधी सुरू आहेत. परवा भव्य मिरवणुकीद्वारे आणि मंगल वाद्यांच्या गजरात या मूर्तींचे मंदिरात आगमन झाले होते.


प्राणप्रतिष्ठापना महोत्सवानिमित्त आज सकाळपासून मंदिर परिसरात होम-हवन आणि विशेष पूजा पार पडल्या. या नूतन मूर्तींच्या दर्शनासाठी बेळगाव शहर आणि उपनगरातील हजारो भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.

आज सायंकाळी मंदिरात भव्य महाआरती होणार असून विद्युत रोषणाईसह मूर्तींना विशेष अभिषेक केला जाईल. महाआरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भक्तांच्या जयघोषाने हेमू कलानी चौक परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला होता.


Recent Comments