बेळगावमध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अत्यंत श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.


भाजप युवा मोर्चाचे विक्रम सोंजी यांच्या नेतृत्वाखाली संभाजी महाराज चौकातील शंभू तीर्थावर महापूजा करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.


यावेळी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आमच्यासाठी दिवाळीच्या सणासारखाच आहे. हिंदू धर्म जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी केलेले बलिदान अभूतपूर्व आहे. सर्व हिंदू बांधवांनी १४ मे हा दिवस आपल्या प्रत्येक घरात दिवाळीप्रमाणे साजरा करावा,” असे आवाहन संजय पाटील यांनी केले.
या सोहळ्याला शिवशंभू भक्त आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments