Vijayapura

विजापूर सराफ बाजारातील शिरूर कॉम्प्लेक्समध्ये स्फोट

Share

विजापूर शहराच्या सराफ बाजार परिसरातील शिरूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका सोन्याच्या दुकानात गुरुवारी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कारागीर जखमी झाले आहेत.

सकाळी दुकानात कामाला आलेले कारागीर सोन्याच्या कुुलूप (कुलामे) कामाला सुरुवात करत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की दुकानाचा शटर तुटून पडला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली.

या घटनेत मूळचे पश्चिम बंगालमधील बीजू (३८) आणि नाना हक्कीम (४०) हे दोन कारागीर भाजले आहेत. त्यांना तात्काळ रिक्षाने रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त विजय मेक्कळकी आणि पोलीस निरीक्षक प्रदीप तळकेरी उपस्थित होते. स्फोटाच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags: