hubbali

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी युथ काँग्रेस आक्रमक

Share

नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ युथ काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

हुबळी शहरातील केशवापूर येथील रमेश भवनपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलक प्रल्हाद जोशी यांच्या घराच्या दिशेने कूच करत असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी शाब्दिक चकमक उडाली.

आंदोलन अधिक तीव्र झाल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

Tags: