Vijayapura

विजापूर पोलिसांचा ‘आसरे’ उपक्रम; घरोघरी जाऊन जनजाग्रुती

Share

ज्येष्ठ नागरिक आणि एकट्या राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने राज्यभर ‘आसरे’ कार्यक्रम राबवला आहे. विजापूर जिल्ह्यात या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचे काम पोलीस करत आहेत.

विजापूर जिल्हा पोलीस दलाने ‘आसरे’ योजना यशस्वीपणे राबवली आहे. जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांतर्गत ३२९ बीटमध्ये ही मोहीम सुरू आहे. ‘घरोघरी पोलीस’ या उपक्रमांतर्गत बीट कर्मचारी एकट्या राहणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. शासकीय योजनांची माहिती देऊन त्या पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम पोलीस करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण, वृद्धापकाळ वेतन आणि संध्या सुरक्षा योजना यांसारख्या योजनांबाबत पोलीस जागृती करत आहेत. विशेषतः निराधार महिला आणि मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना मदत मिळवून दिली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३ लाभार्थ्यांना या मोहिमेमुळे लाभ मिळाला असल्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.

पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या विजापूर पोलिसांच्या या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मल्लिकार्जुन मीसी आणि यलबायी या लाभार्थ्यांनी पोलिसांच्या या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Tags: