बेळगाव शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फूटपाथ आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्यानंतर, आज हिंडलगा रस्त्यावरील अनधिकृत खोकी हटवून महापालिकेने अतिक्रमणधारकांना दणका दिला आहे.


बेळगाव महापालिकेने शहरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. हिंडलगा गणेश मंदिराजवळील रस्त्यावर अनधिकृतपणे उभारलेली १० ते १५ खोकी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.


या मोहिमेत केवळ खोकीच नव्हे तर रस्त्याच्या जागेत आलेले बारचे फलक आणि मोठे जाहिरात बोर्ड देखील हटवण्यात आले. यावेळी उपजीविकेचे साधन असलेल्या दुकानांवर कारवाई होत असल्याने संतप्त व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली.
व्यापाऱ्यांचा विरोध डावलून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. शहरात यापुढेही अशाच प्रकारे अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Recent Comments