Belagavi

बेळगावमध्ये समता सैनिक दलाचा भव्य मेळावा संपन्न

Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार संपूर्ण मानवजातीसाठी आहेत. संविधानाच्या छत्राखाली आपण सर्व एक आहोत, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे प्रदेशाध्यक्ष जी. सी. व्यंकटरमणप्पा यांनी केले.

बेळगावमधील शाहूनगर येथे समता सैनिक दलाचा जिल्हा आणि उत्तर कर्नाटक स्तरीय मेळावा तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष जी. सी. व्यंकटरमणप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण हिरेमठ यांच्या हस्ते झाले.

या सोहळ्यात जी. सी. व्यंकटरमणप्पा यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून, प्रवीण हिरेमठ यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तर हसीना शेख यांनी बेळगाव जिल्हाध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्यासह अन्य नूतन पदाधिकाऱ्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.

बाबासाहेबांना केवळ एका जातीपुरते मर्यादित ठेवू नये. समता सैनिक दल गेल्या २६ वर्षांपासून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे, असे जी. सी. व्यंकटरमणप्पा यांनी म्हटले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. या संघटनेने अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रवीण हिरेमठ यांनी दिली.

यावेळी कार्याध्यक्ष डॉ. जी. गोविंदय्या, कार्याध्यक्ष विनोद जाकू, प्रदेश सरचिटणीस शास्त्री होसमनी, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा दिलशाद ताशिलदार, मल्लिकार्जुन बिळूर, एन. एन. गाळेम्मनवर, परशुराम शिंदे, मुनिसामी, सुरेखा हुबळी, कविता चलवादी यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: