Belagavi

कंग्राळी बुद्रुकमधील महालक्ष्मी गदगेवर विराजमान

Share

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे ४३ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. मंगळवारी देवी गदगेवर आसनस्थ झाली असून, दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

कंग्राळी बुद्रुक गावाच्या इतिहासात अनेक दशकांनंतर हा सोहळा होत आहे. नुकताच देवीचा विवाह सोहळा पार पडला असून, काल सायंकाळी काढण्यात आलेल्या रथोत्सवानंतर देवी आता भव्य गदगेवर विराजमान झाली आहे. मंदिर परिसरातील रोषणाईने यात्रेची शोभा वाढवली आहे.

देवीच्या दर्शनासाठी बेळगावसह आसपासच्या भागातून भाविकांचा ओघ सुरू आहे. विशेषतः महिला भाविकांनी रांगा लावून देवीची ओटी भरत सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे वातावरण असून, पुढील सात दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

 

Tags: