Belagavi

बडाल अंकलगीमध्ये बसस्थानकाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

Share

बेळगाव ग्रामीणमधील बडाल अंकलगी गावामध्ये राज्यसभा खासदार इराणा कडाडी यांच्या निधीतून मंजूर झालेल्या बसस्थानकाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. भाजपचे बेळगाव ग्रामीण माजी मंडल अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना धनंजय जाधव यांनी खासदार इराणा कडाडी यांच्या विकासकामांचा गौरव केला. बेळगाव ग्रामीण भागात खासदारांनी अनेक ठिकाणी बसस्थानके, व्यायामशाळा, ग्रंथालये आणि पेव्हर्स बसवण्यासारख्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे, असे त्यांनी नमूद केले. या विकासकामांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने खासदारांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला मोहन अंगडी, अशोक चापगावी, शिवण्णा बेळगावी, रमेश कलभावी, रमेश अंगडी, राहुल बेळगावी यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बडाल अंकलगी गावातील या नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Tags: