Belagavi

सीपीआय मुशापुरे यांच्या प्रयत्नातून रखडलेला निवृत्तीवेतनाचा प्रश्न अखेर मार्गी

Share

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मोदगा गावातील एका ८० वर्षीय वृद्धाच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे काम यमकनमर्डीचे सीपीआय जावेद मुशापुरे यांनी केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तांत्रिक कारणामुळे बंद असलेले वृद्धापकाळ वेतन पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरू झाले आहे.

मोदगा येथील रहिवासी पुंडलिक जोतेप्पा लोहार हे गेल्या अनेक वर्षांपासून एकाकी आणि हलाखीचे जीवन जगत होते. त्यांना चार मुले होती, मात्र मुलाचा मृत्यू आणि मुली परराज्यात असल्याने त्यांना सांभाळणारे कोणी नव्हते. त्यातच आधार कार्ड अपडेट नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे पेन्शन बंद झाले होते, परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

ही बाब समजताच सीपीआय जावेद मुशापुरे यांनी ‘आसरे योजने’अंतर्गत पुंडलिक यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. मुशापुरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन तहसीलदारांशी संपर्क साधला आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे एप्रिल २०२६ पासून पुंडलिक यांना पुन्हा निवृत्तीवेतन मिळण्यास सुरुवात झाली असून, एका अगतिक वृद्धाला पोलीस दलाने सन्मानाने जगण्याचा आधार दिला आहे.

Tags: