कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांचे वडील आणि खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे सासरे मधुकरराव बळवंतराव निंबाळकर (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले.

दिवंगत मधुकरराव निंबाळकर हे शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी दुपारी १२ वाजता कोल्हापूर येथील शिवाजी पुलाजवळील पंचगंगा नदीकाठी असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेससह सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांनी निंबाळकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Recent Comments