Belagavi

शिंदोळीमध्ये खासदार ईरण्णा कडाडी यांच्या निधीतून बसस्थानक साकारणार

Share

राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी यांच्या विकास निधीतून बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिंदोळी गावात नवीन बसस्थानक उभारले जात आहे. या बसस्थानकाच्या बांधकामाचे भूमिपूजन भाजप ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

खासदार ईरण्णा कडाडी यांनी बेळगाव ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये बसस्थानके, व्यायामशाळा, ग्रंथालये आणि रस्ते सुधारणा यांसारख्या अनेक विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. खासदारांच्या या जनहितकारी कार्यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारत असून, शिंदोळी येथील चन्नम्मा चौकात होणाऱ्या या नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याची भावना धनंजय जाधव यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर, पीराजी अनगोळकर, सविता मुचंडी, सागर मुचंडी, रेखा शहापूरकर, विजयकुमार, उमेश पुरी, बाळू अनगोळकर, महादेव तिगडी, बसवराज तळवार, वीरभद्र पुजारी, मिलन मातारी यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: