Belagavi

डी. सुधाकर सध्या अडचणीत, माणुसकी दाखवा; गृहमंत्र्यांचे आवाहन

Share

माजी मंत्री डी. सुधाकर यांचे प्रकरण आणि आरसीबी सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार या विषयावर गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

सुधाकर प्रकरणात सरकार काहीतरी लपवत असल्याच्या विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी अशा वेळी राजकारणापेक्षा माणुसकी महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, डी. सुधाकर सध्या अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याबद्दल माणुसकी दाखवायला हवी. सरकार काहीही लपवत नसून वस्तुस्थिती समोर येईलच, तोपर्यंत थोडा संयम बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

आरसीबी सामन्याच्या तिकिटांच्या काळाबाजारात केएससीए सदस्यांच्या सहभागाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जर अशा प्रकारे गैरप्रकार झाला असेल आणि एफआयआर दाखल झाला असेल, तर नक्कीच चौकशी करून कडक कारवाई केली जाईल. ऑनलाइन तिकिटांच्या प्रक्रियेशी आमचा थेट संबंध नसला, तरी अवैध विक्री खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दमही त्यांनी दिला. तसेच या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags: