बेळगाव तालुक्यातील होनगा येथील भूतरामनहट्टी भागातील विजया इंटरनॅशनल स्कूलने १० वी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदवून घवघवीत यश संपादन केले आहे.

२०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या परीक्षेत विजया इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये फरहान पटेल याने ९६ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे, तर तन्मय जालिहाळ याने ८७ टक्के गुणांसह यश मिळवले.
इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विनायक बनोशी (८२ टक्के), शांभवी कृष्णोजी (८१ टक्के) आणि सानिका कोलकार (८० टक्के) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण होऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.


Recent Comments