मुद्देबिहाळ तालुक्यातील ऑक्सफर्ड शाळेची विद्यार्थिनी सौजन्या बसवराज कंदकूर हिने दहावी परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या सौजन्याने ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सौजन्या कंदकूर म्हणाली, “राज्यात प्रथम आल्याचा मला खूप आनंद होत आहे. हे यश माझे शिक्षक आणि पालकांच्या सततच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. परीक्षेत पूर्ण गुण मिळवण्यासाठी मी नियमित सराव केला होता.”
“आमच्या शाळेच्या विद्यार्थिनीने ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिले स्थान मिळवले आहे, ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. सौजन्याच्या मेहनतीचे हे फळ आहे.” अशी प्रतिक्रिया सौजन्याच्या पालकांनी व्यक्त केली.
सौजन्याच्या या अपूर्व यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने तिचे विशेष कौतुक केले असून, संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Recent Comments