संपूर्ण राज्याला हिंदू-मुस्लिम सलोख्याचा संदेश देणाऱ्या बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील हजरत सय्यद मोहम्मद गौस शाह कादरी दर्ग्याच्या संदल उरूसला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे.

या उत्सवानिमित्त मोमीन गल्ली ते बाजार गल्ली मार्गे दर्ग्यापर्यंत वाद्यांच्या गजरात भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली. उरूसनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शुक्रवारी कव्वाली, तर शनिवार आणि रविवारी नाटकांचे प्रयोग होतील. तसेच तीन दिवस कुस्ती स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दर्ग्याच्या प्रमुखांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे २२ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत संदल उरूस साजरा केला जात आहे. हा केवळ मुस्लिमांचा सण नसून हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रितपणे हा उत्सव साजरा करतात. हिरेबागेवाडीचा हा संदल संपूर्ण राज्यासाठी जातीय सलोख्याचे एक आदर्श उदाहरण आहे.”
दुसऱ्या एका मान्यवरांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हिरेबागेवाडी येथील हा संदल हिंदू-मुस्लिम बांधव सौहार्दतेने साजरा करतात. येथील प्रत्येक घरात हा सण आदराने साजरा केला जातो. समाजात शांतता आणि सौहार्द टिकून राहावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे.” या सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभागी होऊन दर्शन घेतले.


Recent Comments