राज्यभरात पुढील सात दिवस विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता कायम असतानाच, सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये २३ एप्रिल रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग आणि विजापूर जिल्ह्यांमध्ये २५ एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकातील बीदर आणि कलबुर्गी जिल्ह्यांमध्ये २३ आणि २४ एप्रिल रोजी पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत असून, या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे हवामान खात्याच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.


Recent Comments