Belagavi

बेळगावात ‘गुलमोहर बाग’ समूहातर्फे ‘मास्टर्स रिइमॅजिन’ चित्रप्रदर्शन

Share

बेळगावमधील ‘गुलमोहर बाग’ समूहातर्फे ‘मास्टर्स रिइमॅजिन’ या अनोख्या समूह चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

टिळकवाडी येथील हेरवाडकर स्कूलजवळील कलामहर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गोव्याचे ख्यातनाम कलाकार आणि कला समीक्षक नागेश राव शिरदेसाई, गोव्याचे कलाकार दामोदर मडगावकर आणि बेळगावमधील प्रसिद्ध वास्तुविशारद श्रेयस पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्व कलाप्रेमींसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे दररोज सायंकाळी ५ वाजता होणारे लाईव्ह पेंटिंग प्रात्यक्षिक. जुन्या काळातील महान जागतिक चित्रकारांच्या कलाकृतींना आजचे आधुनिक कलाकार नव्या दृष्टिकोनातून या प्रदर्शनात सादर करणार आहेत. यामध्ये १३ एप्रिल रोजी सचिन उपाध्ये कॅनव्हासवर ऑइल पेंटिंगचे प्रात्यक्षिक दाखवतील. १४ एप्रिलला महेश होनुळे जलरंगातील चित्रकला, १५ एप्रिलला पद्मप्रिया एस. अल्कोहोल इंक्स आणि १६ एप्रिलला सुशील तरबार ॲक्रिलिक पेंटिंगचा डेमो सादर करणार आहेत. या उपक्रमामुळे बेळगावमधील कलाकारांना भेटण्याची आणि थेट चित्रनिर्मिती अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

Tags: