Belagavi

दर्शन गॅलेक्सी हॉलतर्फे भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन

Share

दर्शन गॅलेक्सी हॉलच्या वतीने मँडोळी रोड येथे ‘इंटर क्लब इनव्हिटेशनल’ जलतरण स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. दोन विभागात पार पडलेल्या या स्पर्धेत ५ आणि ६ वर्षे वयोगटातील मुलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला.

यावेळी दर्शन गॅलेक्सीच्या अध्यक्षा मुग्धा देसाई, अश्विनी नावगेकर, जनरल मॅनेजर मानसी खांडेकर, कल्याणी, श्रीकांत देसाई, विजय रेडेकर, जलतरण मार्गदर्शक विश्वास पवार आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतुजा पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चिमुकल्या खेळाडूंच्या कौशल्याचे आणि उत्साहाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Tags: