बेळगावमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या पाच कुख्यात गुन्हेगारांना बेळगाव शहरातून ६ महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिले आहेत.

बेळगावमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात दरोडा, खुनाचा प्रयत्न, अंमली पदार्थांची तस्करी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पाच जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अंमली पदार्थ विक्रीतील प्रमुख सूत्रधार हलगा येथील पिराजी यसोजी, टिळकवाडी येथील यश दावले आणि आदित्य दावले, उद्यमबाग येथील संतोष दिवटगी आणि मच्छे येथील रफिक शेख यांचा समावेश आहे. हे संशयित सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होते.
या कडक कारवाईच्या माध्यमातून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसवली आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा भूषण बोरसे यांनी दिला आहे.


Recent Comments