Belagavi

​बेळगावमध्ये शिक्षक संघाच्या निवडणुकीत मोठा घोळ; पोलिसांत धाव

Share

​बेळगावमध्ये प्राथमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीवरून वाद पेटला आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत शिक्षकांनी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली आहे.

​शिक्षक संघाची निवडणूक १९ तारखेला होणार असल्याचे जाहीर झाले आहे, मात्र अद्याप सामान्य शिक्षकांना मतदार यादी देण्यात आलेली नाही. निवडणूक अधिकारी देखील उपलब्ध नसून नियमांचे उल्लंघन करून ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत यादी न मिळाल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​शिक्षक संघाच्या कार्यालयाला जिल्हा युनिटकडून कुलूप लावून कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी आणि तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोलकार हे स्वतःच्या स्वार्थासाठी अधिकारांचा गैरवापर करत असून ते शिक्षकांना वेठीस धरत आहेत, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
​यावेळी एस. जी. कंबळकर, अन्वर लंगोटी, आनंदगौडा काद्रोळी, ईरप्पा गुळन्नवर, आसीफ अत्तार आणि ए. के. तहसीलदार यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.

Tags: