बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आज शहराच्या विविध भागात अचानक दाखल झाले असून त्यांनी महांतेश नगरमध्ये स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम. यांनी आज महांतेश नगर परिसरातील विविध निवासी भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेची स्वतः पाहणी केली. रस्त्यांची साफसफाई आणि गटारी उपसण्याच्या कामाची त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नियमित स्वच्छता राखण्याचे कडक निर्देश त्यांनी आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक राजशेखर डोणी आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी स्थानिक भागातील स्वच्छतेबाबतची सद्यस्थिती आणि समस्यांची माहिती आयुक्तांना दिली.



Recent Comments