बेळगावमधील अंगडी कॉलेजची विद्यार्थिनी साहिबा खाजामिया सनदी हिने पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेत वाणिज्य शाखेत ९९.१६ टक्के गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे.

पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला असून यामध्ये बेळगावमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये उचगाव येथील रहिवासी आणि बेळगावमधील अंगडी कॉलेजची विद्यार्थिनी साहिबा खाजामिया सनदी हिने वाणिज्य विभागात ९९ टक्के गुण मिळवून अभूतपूर्व यश प्राप्त केले.
ग्रामीण भागातील असूनही साहिबाने यापूर्वीही आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले होते. आता पीयूसी द्वितीय वर्षासारख्या महत्त्वाच्या परीक्षेत तिने ६०० पैकी ५९५ गुण मिळवले आहेत. साहिबाने मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


Recent Comments