बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार यादी सुधारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आमदार अभय पाटील यांच्या उपस्थितीत मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.

आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदार यादीची पडताळणी आणि मॅपिंगचे काम काल यशस्वीरित्या पार पडले. या प्रक्रियेत बीएलओ आणि बीएलए कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहकार्याने प्रत्येक मतदाराच्या माहितीची अचूक पडताळणी करण्यात आली. यावेळी आमदार अभय पाटील यांनी स्वतः अधिकाऱ्यांसोबत विविध भागांचा दौरा करून कामाचा आढावा घेतला.

या मोहिमेवेळी महानगरपालिका सदस्य अभिजित जवळकर, महानगरपालिका पर्यवेक्षक जायण्णावार, समाजसेविका मयूरा पाटील आणि तहसीलदार उपस्थित होते. पारदर्शक मतदानासाठी आणि बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, असे अभय पाटील यांनी स्पष्ट केले.


Recent Comments