Belagavi

बेळगावमध्ये यमराजाकडून रस्ते सुरक्षा नियमांचे प्रबोधन

Share

बेळगावच्या रस्त्यांवर आज चक्क यमराज अवतरल्याचे पाहायला मिळाले. ‘बायकिंग ब्रदरहुड बेळगाव’ आणि वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रस्ते सुरक्षा नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी या अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

हेल्मेट न घालणाऱ्या वाहनधारकांना यमराजाच्या माध्यमातून मृत्यूच्या धोक्याची जाणीव करून देत या पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरक्षित ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांच्या पालनाबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी ‘बायकिंग ब्रदरहुड बेळगाव’ संघाने शहरात भव्य बाईक रॅली काढली होती. सिद्धांत पाटील, प्रवीण कुलकर्णी यांच्यासह संघाचे प्रमुख सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते. यामध्ये झेवियर यांनी साकारलेली ‘यमराजाची’ वेशभूषा आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. “हेल्मेट नसेल तर प्रवास नाही” असा कडक संदेश देत, रस्ते शिस्तीचे उल्लंघन केल्यास मृत्यू पाठीशी असतो, या गंभीर वास्तवाची जाणीव वाहनधारकांना करून देण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: