आपल्या कार्यक्षम प्रशासनाने आणि प्रामाणिक सेवेने जनतेची मने जिंकणारे मार्केट विभागाचे एसीपी संतोष सत्यनायक यांना मानाचे मुख्यमंत्री सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. या गौरवपूर्ण यशाबद्दल कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

बेळगावमधील मार्केट पोलीस विभागाचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या निष्कलंक सेवेची दखल घेत राज्य सरकारने त्यांना प्रतिष्ठित ‘मुख्यमंत्री सुवर्ण पदक’ देऊन गौरविले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने सत्यनायक यांच्यासाठी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दीपक गुडगनट्टी, गणेश रोकडे आणि सिद्धप्पा कांबळे यांनी एसीपींच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले. संतोष सत्यनायक यांची कार्यपद्धती पोलीस विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रासाठी आदर्श असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
सत्कारानंतर बोलताना या सन्मानामुळे आपली जबाबदारी अधिक वाढल्याची भावना एसीपी संतोष सत्यनायक यांनी व्यक्त केली. हे यश माझ्या संपूर्ण टीमचे असून मला सहकार्य करणाऱ्या वरिष्ठांचे आणि जनतेचे मी आभार मानतो, असे संतोष सत्यनायक यांनी म्हटले.
समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखणे हीच माझी प्राथमिकता असून आगामी काळात अधिक जोमाने काम करू, अशी ग्वाही संतोष सत्यनायक यांनी दिली.


Recent Comments